Ek Manva Bhai Lyrics Jain Stavan ऐक मानवा भाई

Ek Manva Bhai Lyrics Jain Stavan 

( मराठी गीत ) 
ऐक मानवा भाई , तु प्रभु नाम घेई , 
नर जन्मा मध्ये नरा सारख्या संसारा पाई , 
घे घे घे , प्रभु नाम घे , माया सारी सोडुन दे ,
या संसारा पाई , या संसारा पाई . . . 

तु म्हणशील पैसा अडका , तो ईथेच राहील सडका , 
अरे मेल्या वरती तुझ्या मागे तो चारान्याचा मडका , 
घे घे घे , प्रभु नाम घे . . . 1 

तु म्हणशील लेकी सुना , त्या तुलाच लावतील चुना , 
अरे मेल्यावरती तुझ्या मागे त्या वाजवतील तुनतुना , 
घे घे घे , प्रभु नाम घे . . . 2 

तु म्हणशील बायका पोरं , ती तुझ्यामागची चोर , 
अरे मेल्यावरती तुलाच नेतील गावाच्या बाहेर , 
घे घे घे , प्रभु नाम घे . . . 3 

तु म्हणशील जावई भोळा , तुझ्या पैशावरती डोळा , 
अरे मेल्यावरती तुझ्या मागे तो खाऊन जाईल पोळ्या , 
घे घे घे , प्रभु नाम घे . . . 4

टिप्पणियाँ